अहमदनगर येथे नवीन कारागृह होणार:अमिताभ गुप्ता
राज्य कारागृह विभागात अनेक वर्षे भरती प्रक्रिया प्रलंबित होती.सध्या राज्य कारागृह विभागात पाच हजार कर्मचारी कार्यरत असून नव्याने 2000 पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रियेमध्ये अधिक ठेवण्यात आली आहे. मागील वर्षी 120 कयद्यांचा खराब प्रकृतीमुळे कारागृहात मृत्यू झाला होता.यंदा ते प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,अशी माहिती राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह बनवण्यात येणार आहे तसेच आणखी दोन नवीन कारागृह विभाग बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार कारागृह विभागात भरती करण्याविषयी सकारात्मक दिसत आहे.
Karagruh bharti 2023 कारागृह भरती 2023 विषयी अति महत्त्वाच्या बाबी:
1 karagruh police bharti 2023
2 कारागृह पोलीस भरती 2023
3 महाराष्ट्र कारागृह पोलीस भरती माहिती 2023
4 कारागृह पोलीस भरती 2023 कधी होणार(karagruh police bharti 2023)
5 maharashtra police bharti कारागृह पोलीस भरती 2023 शैक्षणिक पात्रता काय असावे.
6 कारागृह पोलीस भरती 2023 साठी वयोमर्यादा काय
7 karagruh police bharti शारीरिक चाचणी.
कारागृह पोलीस भरती 2023 कधी होणार(karagruh police bharti 2023)
सध्या कारागृह पोलीस भरती विषयी फक्त घोषणा झालेली आहे अजूनही अधिकृतपणे सांगण्यात आलेली नाही तरीसुद्धा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यानंतर घोषणा अमलात येऊ शकते.
maharashtra police bharti कारागृह पोलीस भरती 2023 शैक्षणिक पात्रता काय असावे.
उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच बारावी उत्तीर्ण असावे लागणार आहे.
कारागृह पोलीस भरती 2023 साठी वयोमर्यादा काय
उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे.
* 2023 पॅटर्नमध्ये बदल
जुन्या पॅटर्ननुसार आधी लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येत होती.पण आता शारीरिक चाचणी आधी असेल.शारीरिक चाचणीमध्ये 50 टक्के गुण आवश्यक आहे तरच आपण लेखी परीक्षेला पात्र असाल.
karagruh police bharti 2023 शारीरिक चाचणी कशी घेतली जाणार
कारागृह पोलीस भरती शारीरिक चाचणी सुद्धा पोलीस शिपाई भरती शाळेत चाचणी सारखीच घेतली जाते. आधी 100 गुणांची चाचणी घेतली जायची आता 50 गुणांची चाचणी घेतली जाते.
पुरुष उमेदवारांसाठी तीन स्टेज असतात.
पुरुष उमेदवार | गुण |
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकूण | 50 गुण |
महिला उमेदवारांसाठी तीन स्टेज असतात
महिला उमेदवार | गुण |
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकूण | 50 गुण |
लेखी परीक्षा कशी असते
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी : 25 प्रश्न 25 गुण
- बुद्धिमत्ता चाचणी : 25 प्रश्न 25 गुण
- मराठी व्याकरण : 25 प्रश्न 25 गुण
- अंकगणित : 25 प्रश्न 25 गुण
- रिक्त जागेच्या 1:10 प्रमाणात उमेदवार लेखीसाठी पात्र
- एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा ( वेळ 90 मिनिटे )
- पेपर हा मराठी भाषेत असतो
- पेपर ची स्वरूप : बहुपर्यायी पद्धत
- परीक्षेत एकूण ४ विषयांवर प्रश्न विचारले जातात
100 प्रश्न 100गुण
महत्वाची सूचना :
- तुम्हाला भरतीची पूर्वी तयारी करता यावी म्ह्णून हि माहिती सांगितलेली आहे.
- येणारी भरती याच पद्धतीने घेतली जाईल असे नाही त्यात बदल सुद्धा होऊ शकतो.