You are currently viewing अमरावती जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 त्वरित करा अर्ज
jilha parishad bharti amravati 2023

अमरावती जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 त्वरित करा अर्ज

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने विविध विभागातील पदभरती चालू केलेली आहे. त्यातीलच एक अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी ची जाहिरात आलेली आहे.संबंधित विभागाने दिलेल्या सूचना आपण आज बघणार आहोत.त्यात आपण परीक्षेचा शुल्क, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, व इतर सर्व महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.उमेदवाराने अर्ज करतेवेळी कोणची काळजी घ्यायची आहे.अनुसूचित क्षेत्राबाहेरील(बिगर पेसा)/अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) सरळ सेवेची रिक्त पदे पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळ सेवेची रिक्त पदे असे एकूण 653 पदांसाठी भरती होणार आहे. तरी आपण सविस्तर जाणून घेऊया.

संवर्गनिहाय सरळ सेवेची रिक्त पदे

संवर्गपदसंख्या
आरोग्य पर्यवेक्षक1
आरोग्य सेवक (पुरुष) 40%14
आरोग्य सेवक (पुरुष) 50%79
आरोग्य सेवक (महिला)304
औषध निर्माण अधिकारी28
कंत्राटी ग्रामसेवक67
सरळ सेवेची रिक्त पदे 2023

यांसारख्या अशा एकूण 25 संवर्गातील 653 पदसंख्या भरावयाची आहे. संवर्ग व पदसंख्येची खाली दिलेल्या PDF file मध्ये नमूद केली आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या PDF file चे अवलोकन करायचे आहे.

अर्ज सादर करण्यापूर्वी अति महत्त्वाची सूचना

  • उमेदवाराने एकाच पदाकरिता विविध जिल्हा परिषदेमध्ये अर्ज सादर करू नये कारण राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये परीक्षा होणार आहे.
  • एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास जर उमेदवाराला परीक्षा देता आली नाही तर जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. असे जिल्हा परिषदेद्वारे सांगण्यात आले आहे. तरी उमेदवाराने ह्या गोष्टी लक्षात घेऊन अर्ज सादर करायचा आहे.

परीक्षेचे स्वरूप

सर्व पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून राहतील.

इतर सर्व संवर्गातील तांत्रिक व इतर प्रश्न हे मराठी व इंग्रजी माध्यमातून राहतील. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी  उमेदवाराने खाली दिलेले PDF file बघून घ्यायचे आहे.

परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षेचे वेळापत्रक हे www.zpamravati.gov.in या अमरावती जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल तरी उमेदवारांनी वारंवार या संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करायची आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

अमरावती जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 05 /08/2023 ते दिनांक 25/08/2023 ही असणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी  वेळेतच आपला अर्ज सादर करायचा आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही 25/08/2023  असणार आहे.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराला 1000 रु.  परीक्षा शुल्क असणार आहे. तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रु. इतका प्रवेश शुल्क असणार आहे.

याविषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या PDF file link वर क्लिक करावे.

याविषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या PDF file link वर क्लिक करावे.

Leave a Reply