मेगा भरती latest important update :
२० हजार पोलिसांची भरती २०२२ पहिला टप्पा ऑक्टोबर मध्ये सुरु होण्याची शक्यता....?
२० हजार पोलिसांची भरती पहिला टप्पा ऑक्टोबर मध्ये सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील वाढत्या खटल्यामुळे आणि सततच्या वाढत्या बंदोबस्तामुळे राज्यातील पोलीस दलावर वाढता भार बघता रिक्त पदे आणि भरीव पदे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयी सूचक वक्तव्य केल होत. तर आता ऑक्टोबर २०२२ मध्ये पोलीस भरती २०२२ पहिला टप्पा सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ७२३१ पद मेगा भरती तर निश्चित होतीच त्यात वाढीव भर होणार असल्याच कळत.
आता मधल्या काळात सरकार बदल मुळे भरती विलंबित झाली असावी आता पूर्वीच्या पार्शवभूमीवर २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९हजार ७५८ रिक्त पदाची दोन टप्यात भरती होणार आहे . पहिला टप्पा ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पोलीस काँस्टेबलच्या ७००० हजार जागांची भरती :
महाराष्ट्रात पोलीस काँस्टेबलच्या ७००० हजार जागांची भरती , १५ सप्टेंबर पासून अर्जाची प्रक्रिया होणार सुरु वयोमर्यादा १८ ते २८ वर्ष अशी आहे.२०२२जिल्हानिहाय पदे अशी आहे : मुंबई १४१३ जागा,ठाणे शहर २३६, पुणे शहर १८२, पुणे ग्रामीण १५८, नागपूर ग्रामीण १०८, नागपूर शहर १५३, जळगाव १५४, सोलापूर ग्रामीण १४५, मीरा-भाईंदर ५०५, नवी मुंबई ३५८, मुबई रेल्वे पोलीस ५०५, गडचिरोली ४१५, नांदेड १२८,अहमदनगर १३९,बुलढाणा ११७, पालघर ११५, अशा पद्धतीने जागांची भरती होणार आहे.
0
पद भरती
अग्निपथ योजने अंतर्गत लष्करात मेगा भरती बघा कसे असेल भरती स्वरूप :
- अग्निपथ योजने अंतर्गत लष्करात चार वर्षांसाठी अग्निविरांची भरती १३ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या मेळाव्यात ८ सप्टेंबरपर्यंत ७ जिल्ह्यांतील ८६ हजार युवक सहभाग नोंदवणार आहे. औरंगाबाद ला विद्यापीठाच्या मैदानावर १७ दिवस मेळावा होणार आहे. रोज ६ हजार युवकांना बोलावले आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया रात्रभरच चालणार आहे.
- अग्निवीर जनरल ड्युटी ,अग्नीवर ट्रेड्समन ,अग्निवीर टेकनिकल, अग्निवीर कलार्क,आणि अग्निवीर स्टोर किपर आदी कॅटेगरी आहे . औरंगाबाद,बुलडाणा,हिंगोली,जळगाव,जालना,नांदेड आणि परभणी या सात जिल्ह्यांतील युवक येतील. रात्री ११ ते सकाळी ७ दरम्यान शारीरिक चाचणी घेतली जाईल.
- युवकांनी प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागद्पत्रच सोबत आणायची आहेत. इतर कुठली वस्तू आणता येणार नाही.
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२२ बघा नवीन important update :
महाराष्ट्र पोलिसांची २९ हजार ४०१ पदांची मेगा भरती लवकरच सुरु होणार
- रिक्त पदांमध्ये आठ पोलीस महासंचालक पदांपैकी तीन, तर हवालदारांच्या ९५ हजार ७१३ मंजूर पदांपैकी १९ हजार ६१ रिक्त पदे आहेत. थोडक्यात,एक लाख लोकसंख्येमागे १९८ पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना ती केवळ १७४ आहेत, असे राज्य सरकारने स्पष्ट केले.
- या वेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून कोरोना काळात पोलिसांच्या रिक्त पदांची संख्या तीन पटीने वाढल्याचे स्पष्ट केले. २०१९ मध्ये रिक्त पदांची टक्केवारी ५ होती.ती १३.४ टक्क्यांपर्यंत गेली असून, ५ जुलैपर्यंत एकूण २ लाख १९ हजार ७७६ मंजूर पदांपैकी २९ हजार ४०१ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट केले.
- पोलिसांची रिक्त पदे कशी आणि कधी भरणार, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हा प्रश्न उपस्थित करताना हि रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहात, यासंभंदी प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले.
- पोलीस कर्मचाऱ्यांची मंजूर पदे लवकर भरण्याचे तसेच पोलीस संशोधन आणि विकास विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्याबळ वाढवण्याचे आदेश राज्य सरकारला द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्य न्यायालयात दाखल केली.
मित्रांनो लवकरच महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस मेगा भरती ला सुरुवात होणार आहे . मधल्या काळात सरकार बदलामुळे बरेचसे निर्णय प्रलंबित होते पण आता पुन्हा एकदा भरती निर्णयाला वेग मिळताना दिसत आहे आपण बघितले असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भरती विषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे त्यामुळे लवकरच याविषयी निर्णय होईल.
अग्निपथ योजने ची माहिती बघा येथे मेगा भरती चालू १३ ऑगस्ट......
- विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या कार्यरत प्राध्यापक आणि कोचला भरती दरम्यान त्यांच्या विभागात जाण्यासाठी लष्कराने दिलेल्या ओळखपत्र दाखून आत जावे लागेल. युवकांनी सर्व ओरिजनल शैक्षणिक कागदपत्र घेऊन येणे गरजेचे आहे.त्याशिवाय अर्ज करताना दिलेल्या फॉरमॅटमध्ये शपथपत्र सोबत आणावे. शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणीत पात्र ठरणार्यांना पुढे संधी दिली जाईल. १३ नोव्हेंबरला सर्व चाचण्यांत पात्र ठरणार्यांची कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाईल.
- १३ ऑगस्टला औरंगाबादचे सर्व तहसील परिसरातील युवक अग्निवीर ट्रेड्समनसाठी बोलावले आहेत.
- १७ ऑगस्टला जालन्यातील युवक अग्निवीर जनरल ड्युटी साठी बोलवण्यात अ|ली आहेत.
- १८ ऑगस्टला पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील युवक येतील. अग्निवीर जनरल ड्युटी साठी ते शारीरिक चाचणी देतील.
- १९ ऑगस्टला पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव,आणि वैजापूर तालुकयातील अग्निवीर जनरल ड्युटी साठी भरती होणार आहे.
- २० ऑगस्टला पुन्हा औरंगाबाद,बुलढाणा,हिंगोली,जळगाव,जालना,नांदेड आणि परभणीच्या युवकांना पाचारण केले जाईल. ते अग्निवीर क्लार्क,स्टोअर कीपर आणि टेकनिकलसाठी हजर राहतील.
- २१ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर,भडगाव,चाळीसगाव.
- २२ ऑगस्ट बोदवड,चोपडा,धरणगाव,एरंडोल,जळगाव आणि जामनेरसाठी राखीव आहे.
- २३ ऑगस्टला मुक्ताईनगर,भुसावळ,पाचोरा,रावेर,आणि यावल तालुक्यासाठी राखीव आहे.
- २५,२६ हिंगोली परभणी आणि नांदेड साठी राखीव आहेत.
- २७,२८ ऑगस्ट हे दोन्ही दिवस बुलडाण्यासाठी आहेत.
महाराष्ट्र पोलीस मध्ये ७ हजार २३१ पदांसाठी पोलीस भरती २०२२ :
- महाराष्ट्र पोलीस मध्ये ७ हजार २३१ पदांसाठी पोलीस भरती होणार.Maharashtra Police (Maharashtra State Police Department) will announce new Recruitment and Fulfill the Vacancies For the posts Police Constable (Shipai). Eligible candidates are directed to submit their application online through https://www.mahapolice.gov.in/ this Website Total Total 7000 Vacant Posts have been announced by Maharashtra Police (Maharashtra State Police Department) Recruitment Board, Maharashtra in the advertisement 2022. The recruitment process is expected to take place in october 2022. Last date to submit application is available soon in the official website.