You are currently viewing Arogya vibhag bharti 2023:आरोग्य खात्यात 10,949 पदांची मेगा भरती येथे बघा संपूर्ण माहिती
arogya vibhag bharti 2023

Arogya vibhag bharti 2023:आरोग्य खात्यात 10,949 पदांची मेगा भरती येथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी राज्याचे आरोग्य खाते सुवर्णसंधी उपलब्ध करून देत असून आरोग्य खात्यात तब्बल 10,949 पदांची मेगा भरती होणार आहे.या मेगा भरती अंतर्गत गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध 60 प्रकारची एकूण 10,949 पदे भरली जाणार आहेत व याची जाहिरात आज प्रसिद्ध केली जाईल.यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल.ही संपूर्ण मेगा भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे असा विश्वास समस्त उमेदवारांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिला आहे.याविषयी कुठल्या आरोग्य सेवा मंडळाला किती पदे आहेत हे आपण खाली सविस्तर जाणून घेऊयात.

आरोग्य विभाग मेगा भरती arogya vibhag bharti 2023
  • आरोग्य विभागात 10949 पदांची मेगा भरती.
  • 29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023 दरम्यान अर्ज भरण्याची मुदत.
  • भरती प्रक्रिया टीसीएस TCS मार्फत राबवली जाणार.
  • गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध 60 प्रकारची पदे.
आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत मेगा भरती ट्विट tanaji savant mega bharti twit
tanaji sawant bharti twit
आठ आरोग्य सेवा मंडळात मेगा भरती arogya vibhag bharti maharashtra
आरोग्य सेवा मंडळविविध पदांसाठी एकूण जागा
मुंबई आरोग्य सेवा मंडळ,ठाणेविविध 26 पदांसाठी एकूण 804 जागा
पुणे आरोग्य सेवा मंडळ, पुणेविविध 45 पदांसाठी एकूण 1671 जागा
नाशिक आरोग्य सेवा मंडळ, नाशिकविविध 29 पदांसाठी एकूण 1031 जागा
कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ, कोल्हापूर विविध 25 पदांसाठी एकूण 639 जागा
औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ, औरंगाबादविविध 23 पदांसाठी एकूण 470 जागा
लातूर आरोग्य सेवा मंडळ, लातूर विविध 20 पदांसाठी एकूण 428 जागा
अकोला आरोग्य सेवा मंडळ, अकोलाविविध 22 पदांसाठी एकूण 806 जागा
नागपूर आरोग्य सेवा मंडळ, नागपूरविविध 25 पदांसाठी एकूण 1090 जागा
एकूण जागा6939 पदे
arogya vibhag bharti maharashtra 2023

गट ‘ड’ संवर्गासाठी राज्यातील 34 जिल्ह्यांमधून 4010 पदांची नोकर भरती केली जाणार आहे.यात मुंबई शहर व उपनगर हे दोन जिल्हे वगळणार आहेत.

Leave a Reply