नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (midc)यांच्या भरती विषयी जाणून घेणार आहोत.यात गट ‘अ’, गट ’ब’ आणि गट ‘क’ असे एकूण 34 संवर्गातील 802 पदांसाठी सरळ सेवेने भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी याची नोंद घेऊन तयारीला लागायचे आहे. यामध्ये 802 पदांसाठी भरती असल्यामुळे व 34 संवर्ग असल्यामुळे याचा विचार घेऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. चला तर मग आपण सविस्तर जाणून घेऊया midc bharti 2023 विषयी.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती midc bharti
- 34 संवर्गातील 802 पदांसाठी होणार भरती.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे.
MIDC Bharti 2023 ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठीचे वेळापत्रक
तपशील | दिनांक |
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक | 02/ 09/ 2023 |
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 25/9/2023 |
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत | 25/9/2023 |
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक | परीक्षेच्या आधी 7 दिवस |
MIDC Bharti 2023 last date
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दि.25/9/2023 ही जरी असली तरी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने यात काही बदल झाला तर वेळोवेळी www.midcindia.org या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.