महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट – क )संवर्गातील एकूण 4625 पदांच्या जागा सरळ सेवा भरती लवकर चालू होण्याची शक्यता आहे. सदरील तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हा निहाय संभावित पदांची माहिती उपलब्ध झाली असून त्या जाहिरातीनुसार दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे उमेदवारांनी सदरील माहिती पदांची माहिती घेऊन तयारीला लागायचे आहे .
पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी / वाढ) होण्याची शक्यता आहे.
खेळाडू आरक्षण :
एका पेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रामाणित करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
दिव्यांग आरक्षण :
दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदावर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
अनाथ आरक्षण :
अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्ग चा आहे, त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
माजी सैनिक आरक्षण :
उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्यांनी त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.अन्यथा त्यास माजी सैनिकांचा अनुज्ञ असलेले लाभ मिळणार नाहीत.
पात्रता :
भारतीय नागरिकत्व.
वयोमर्यादा :
1 जानेवारी 2023
*************************
येथे जाहिरात pdf बघा
*************************
******************************
Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार