मेगा पोलीस भरती २०२२ . तरुणांसाठी खुशखबर १२ हजार पदे भरणार :
२०२० मधील ७२३१ पदांसाठी पोलीस महासंचालकाकडून भरती करण्यासाठीचा प्रस्थाव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतांसाठी तातडीने सादर करावा , असे निर्देश उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारी दिले.राज्यात २०१९ मधील ५२९७ पोलीस शिपाईपदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन प्रशिक्षण सुरु आहे.
पोलीस दलाचे आधुनिकरण २०२२ Latest Update :
पोलीस ठाण्याची संख्या वाढविण्याबरोबरच पोलीस दलाच्या आधुनिकरनाचा प्रस्थाव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. पोलिसांसाठी क्रीडा अकॅडेमी उभारण्यात येणार आहेत याबाबतचा निर्णय हि बैठकीत सोमवारी झाला. नवीन पोलीस ठाण्यांच्या उभारणीसाठी सर्वंकष आराखडा तयार करा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अपराधसिद्धतेचा दर वाढविण्यासाठी नियोजन करा, पोलीस दलासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्थाव शासनास सादर करण्यात यावे असे हि सांगण्यात आले.
दोन टप्यात २० हजार पोलिसांची भरती २०२२ Latest Update :
राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरुणांना पोलीस भरतीची प्रतीक्षा आहे. २०१९ मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्त पदाची पोलीस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन सरकारने ७हजार पदांची भरती जाहीर केली होती खरी पण तिला काही मुहूर्त लागलाच नाही. आता शिंदे फडणवीस सरकारने याविषयीचे ठोस निर्णय घेऊन लवकरात लवकर भरती २०२२ सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.
भरती २०२२ bharti 2022 latest update विषयी जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.CLICK HERE