INDIAN ARMY / आर्मी भरती

अग्निवीर मागील भरती पेक्षा दुप्पट संख्येने तरुणांचा सहभाग Latest Update..

  • जम्मू -काश्मीरमध्ये दहशदवादाचा फणा ठेचला गेल्याने तेथील युवक देश्याच्या सरंक्षणासाठी उत्साहाने समोर येत आहेत. केंद्रशासित प्रदेशात अग्निवीरांच्या भरतीसाठी सुरु असलेली भरती मेळावे याचा पुरावा आहे. राज्यातून या मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्यांची संख्या २५हजारांवर गेली आहे. यंदा मागील भरतीच्या तुलनेत दुप्पट युवक आलेले आहेत.लष्कर भरतीची नवी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हा पहिला मेळावा आहे. जेथे एकेकाळी दहशत वाद्यांचा बोलबाला होता अशा ठिकाणाहून देखील भरपूर प्रमाणात युवक आलेले दिसत आहे.
  • एकट्या कुपवाडसाठी मेळावा ४ दिवस चालला. लष्कर भरती संघटनेने हैदरबेग,पाटण येथेही मेळावा घेतला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि, राज्यात शेवटचा भरती मेळावा २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर कोरणामुळे देशभरातील भरती थांबली होती. काही महिन्यांपूर्वी अग्निपथ योजना लागू करण्यात आली. त्याअंतर्गत ४० हजारपेक्षा जास्त अग्निवीरांची भरती केली जाईल. असे सांगण्यात आले आहे. 

अग्निपथ योजने अंतर्गत लष्करात भरती :

  • अग्निपथ योजने अंतर्गत लष्करात चार वर्षांसाठी अग्निविरांची भरती १३ ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या मेळाव्यात ८ सप्टेंबरपर्यंत ७ जिल्ह्यांतील ८६ हजार युवक सहभाग नोंदवणार आहे. औरंगाबाद ला विद्यापीठाच्या मैदानावर १७ दिवस मेळावा होणार आहे. रोज ६ हजार युवकांना बोलावले आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया रात्रभरच चालणार आहे.
  • अग्निवीर जनरल ड्युटी ,अग्नीवर ट्रेड्समन ,अग्निवीर टेकनिकल, अग्निवीर कलार्क,आणि अग्निवीर स्टोर किपर आदी कॅटेगरी आहे . औरंगाबाद,बुलडाणा,हिंगोली,जळगाव,जालना,नांदेड आणि परभणी या सात जिल्ह्यांतील युवक येतील. रात्री ११ ते सकाळी ७ दरम्यान शारीरिक चाचणी घेतली जाईल. 
  • युवकांनी प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागद्पत्रच सोबत आणायची आहेत. इतर कुठली वस्तू आणता येणार नाही.

महाराष्ट्रात औरंगाबाद मध्ये ८६००० अग्निवीर नोंदवणार सहभाग

अग्निपथ योजने ची माहिती बघा येथे मेगा भरती चालू १३ ऑगस्ट......


  • विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या कार्यरत प्राध्यापक आणि कोचला भरती दरम्यान त्यांच्या विभागात जाण्यासाठी लष्कराने दिलेल्या ओळखपत्र दाखून आत जावे लागेल. युवकांनी सर्व ओरिजनल शैक्षणिक कागदपत्र घेऊन येणे गरजेचे आहे.त्याशिवाय अर्ज करताना दिलेल्या फॉरमॅटमध्ये शपथपत्र सोबत आणावे. शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणीत पात्र ठरणार्यांना पुढे संधी दिली जाईल. १३ नोव्हेंबरला सर्व चाचण्यांत पात्र ठरणार्यांची कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाईल.
  • १३ ऑगस्टला औरंगाबादचे सर्व तहसील परिसरातील युवक अग्निवीर ट्रेड्समनसाठी बोलावले आहेत.
  • १७ ऑगस्टला जालन्यातील युवक अग्निवीर जनरल ड्युटी साठी बोलवण्यात अ|ली आहेत.
  • १८ ऑगस्टला पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील युवक येतील. अग्निवीर जनरल ड्युटी साठी ते शारीरिक चाचणी देतील. 
  • १९ ऑगस्टला पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव,आणि वैजापूर तालुकयातील अग्निवीर जनरल ड्युटी साठी भरती होणार आहे.
  • २० ऑगस्टला पुन्हा औरंगाबाद,बुलढाणा,हिंगोली,जळगाव,जालना,नांदेड आणि परभणीच्या युवकांना पाचारण केले जाईल. ते अग्निवीर क्लार्क,स्टोअर कीपर आणि टेकनिकलसाठी हजर राहतील.
  • २१ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर,भडगाव,चाळीसगाव.
  • २२ ऑगस्ट बोदवड,चोपडा,धरणगाव,एरंडोल,जळगाव आणि जामनेरसाठी राखीव आहे.
  • २३ ऑगस्टला मुक्ताईनगर,भुसावळ,पाचोरा,रावेर,आणि यावल तालुक्यासाठी राखीव आहे.
  • २५,२६ हिंगोली परभणी आणि नांदेड साठी राखीव आहेत.
  • २७,२८ ऑगस्ट हे दोन्ही दिवस बुलडाण्यासाठी आहेत.

Contact Us :

policebharati4@gmail.com